STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

प्रेम असतं तरी काय..?

प्रेम असतं तरी काय..?

1 min
227

प्रेम असतं नितळ हास्यच प्रतिक,

ते किती ही लपवण्याचा प्रयत्न केला तरी न लपण्याजोग.

                   

प्रेम असतं अथांग सागरात तरंगणाऱ्या नावे सारख,

कधी छिद्र पडून बुडणार.   

                 

प्रेम असतं मुक्या कळी सारख,

हळूहळू उमलून पाकळ्यांसारखं सर्वत्र पसरणार.


प्रेम असतं जर दिल तर खूप आनंद देणार,

नाहीतर खूप खूप रडवणार.           


प्रेम असतं समईतील वाती सारख ,

जो पर्यंत तेलाची साथ असते तो पर्यंतच प्रकाश देणार.


प्रेम असतं एकमेकांवर अवलंबून,

जो पर्यंत विश्वास असतो तो पर्यंतच टिकणार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy