वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा
पावन झाली ही मातृभूमी
जन्मले संत गाडगे महाराज
विदर्भ या ठिकाणी
संत हे नव्या विचारांचे जरी असे निरक्षर
दिवसभर गावची स्वच्छता,
आणि रात्री करायचे प्रबोधन
अंधश्रद्धा, अज्ञानता इ.पासून
जागरूक केले समाजाला
अन् कीर्तनातून केले साक्षर
लोक कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले, त्यागिले दार स्वार्थाचे
स्वच्छतेचे प्रणेते लाभले,
हे नशीब भारताचे
शिक्षणाचा पुरस्कार
कीर्तनाद्वारे आधार जागोजागी साक्षात्कार
त्यागाची नि राष्ट्र प्रेमाची प्रचिती म्हणून
नाव दिल्या गेले अमरावती विद्यापीठाचे
स्वच्छतेचे प्रणेते थोर समाज सुधारक
जाणला ज्यांनी माणसात ईश्वर
अशा महान समाज परिवर्तनास
माझे विनम्र अभिवादन 🙏🙏
