STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

फुलपाखरू मी

फुलपाखरू मी

1 min
263

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

लचकमुरड पहा माझी,

वाऱ्यासंगे करितसे मी खेळी,

पकडण्या सरसावती सानथोर,

छटा माझी निरनिराळी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

असे रूप माझे मोहक जरी,

नाजूक कोमल भारी,

नका हात लावू मजसि गडे,

विस्कटून जाईल कोमलता सारी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

बागडणे इकडून तिकडे,

प्रिय असे मजसि भारी,

फुलातील मधुकंद चाखण्या,

वावर माझा असे अनेक फुलावरी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

फूलपाखरू मी असे स्वच्छंदी,

जगणे ही माझे असे आनंदी.

असे मी किती विविधरंगी,

मोहविण्याची कला जपली मम अंगी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

फुलाफुलांवर भिरभिर माझी,

बागडताना असे मी मनमौजी.

आयुष्य आहे छोटेसे जरी,

जगणं असते उत्साही भारी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

हीच आहे गंमत खरी,

जगण्याची ही रीतच न्यारी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action