मीच पैसा
मीच पैसा
मीच ते समजले तर रद्दी आहे
दिसायला कागद आहे
माझं मूल्य काहीच नव्हतं
पण वर्षानुवर्षे माझं मूल्य
तुम्हीच वाढवलं आहे!
मीच ते समजलं तर सर्व काही आहे
नाही समजलं तर
काहीच नाही !
मीच ते माझ्या येण्याने
कोणी श्रीमंती पाहते
तर माझ्या न येण्याने
कोणी गरीबी पाहते!
माझा असण्यानेच वाकाचा
धनी लाखाला गेला
व माझ्या नसण्यानेच
लाखाचा धनी वाकाला गेला !
मीच ते ज्यांचं जीवन बहारदार फुलवलं
मीच ते ज्यांचं जीवन सुखात सजवलं!
