ती कविता
ती कविता

1 min

208
ती अस्तित्व आहे
ती अथांग सागराचा किनारा आहे....
ती काळोख्या रात्रीचा चंद्र आहे
ती लखलखत्या सूर्याचा प्रकाश आहे...!
ती जीवनातील दुःखाचा प्रारंभ आहे
ती दुःखाचा आंत आहे....!
ती बोलण्याची भाषा आहे
ती शिकण्याची कला आहे ...!
ती शब्दाचा भांडार आहे
अनुभवाचा खजिना आहे....!
ती लेखणीची सुरवात
तर स्वल्पविरामाचा अंत आहे....!
ती व्यक्त होण्याचं माध्यम आहे
ती अनुभवलेलं वास्तविक लिखाण आहे...!