मी..?
मी..?
माझ्या वडिलांची राजकुमारी आहे मी,
लाडात वाढली आहे मी.
आईची तर सावली आहे मी,
तिच्या कडूनच तर सार काही शिकत आली आहे मी.
माझ्या भावाची राखी आहे मी,डेरीमिल्क साठी
त्याच्याशी खूपदा भांडली आहे मी.
माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे मी,
त्यांच्या प्रत्येक सुखाची जबाबदारी आहे मी.
माझ्या मुलांची आई आहे मी,
त्यांच्या जीवनाचा आधार आहे मी.
प्रत्येक ठिकाणी आहे मी,
पण माझी... "मी"कुठं आहे..?
