STORYMIRROR

Pallavi Udhoji

Action

3  

Pallavi Udhoji

Action

मनावरचे माझे राज्य

मनावरचे माझे राज्य

1 min
214

माझ्या मनावरती राज्य तुझे

कसे तुला कळले नाही

भास होतो तुझा सारखा

मला हे कळले नाही

दुःखाशी लढता लढता

हरले मी तुझ्या संगे

हसत हसत संघर्ष केला

काळ सरला हे सुध्दा कळले नाही

मधाचे बोट चाखवून ज्यांना

कोणी कसे फसवले

गाफील राहिलो आपण

मना आपल्या कळले नाही

वाट पाहणे ह्या जगी

इथे सगळे होते तरी

दैव लाविते मधाचे बोट

नजरेस कधी पडले नाही

समजून आपले सर्वांना जरी

आपले कोण परके कोण

कोण जवळ कोण दूर

आम्हा हे समजले नाही

दूर प्रवासास निघाले आता

अवघड झाले तरी

अडखळते का पाऊल माझे?

उमगत मजला तरी नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action