मायेचा घास
मायेचा घास


घरट्यांत पक्ष्यांची पिल्ले
इवलीशी चोच उघडती
पक्षी पक्षिणी पिल्लांना
चिमण घास भरवती | |१| |
पिलांवर त्यांची असते
अगदीच अनोखी माया |
ध्यास उरी ठेऊन जणू
झिजवत राहतात काया | |२| |
इवल्याश्या चोचीत प्रायासानं
मायेचा घेऊन चिमण घास |
भरवतात प्रेमाने हळूवारपणे
इवल्या गोजिरवाण्या पिलांस | |३| |
ये भरते प्रेमाचे सर्वांस पाहून
वाटते अप्रूप आपल्या मनास |
मुकं प्रेम मुक्या पाखरांचे पाहून
संवादहिन तरीही साहचर्य पणास | |४| |
आई-बाबा समर्पित पिल्लांना
मानवाचे असो वा पाखरांचे |
भरवतात प्रेमाने चिमणचारा
वेडी माया अन् लाड लेकरांचे | |५ | |