STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action Inspirational

3  

Sarika Jinturkar

Action Inspirational

बेफिकीर

बेफिकीर

1 min
211

 जीवनाच्या या प्रवासात

 सुख येणार दुःख जाणणार

 नाही उलगडणार कधी खेळ 

या जीवनाच्या रहस्याचा 

 उघडुनी खिडक्या मनाच्या 

कधीतरी होऊन बेफिकीर 

आनंद घ्यावा या सुंदर जीवनाचा

  

सेकंदा सारखं न धावता  

असावा संयम तासाचा 

कधीतरी बेफिकीर होऊन जगावे 

कोंडमारा होईल नाहीतर श्वासाचा  


क्षणभंगुर हे जीवन

 दूर पळवावे चिंता विवंचना

 निराशा आणि भीतीला 

पसरावे सर्वत्र आनंदाचे कण 

 कधीतरी जगावे बेफिकीर होऊन 

 धावपळीत ही शोधावे विसाव्याचे क्षण

 

 निरोगी आरोग्य म्हणजे खरे धन 

विनाकारण चिंता म्हणजे रोगाला आमंत्रण

 होऊनी बेफिकीर खळखळून हसावे,

अलगद जपावे सगळ्यांचे मन


 यशापयशाचा विचार न करता अडचणी 

अडथळ्याला समोर जावे  

जगाची पर्वा न करता होईनी बेफिकीर 

मनासारखे स्वच्छंदी जगावे 


 आपुलकीची मायेची 

माणसं संपत्ती खरी 

जास्त हाव नव्हे बरी 

 रुसवा-फुगवा दूर ठेवूनी 

सडा पडू द्यावा प्रेमाचा  

प्रेमाची माणसं मिळणं 

ही उदय असतो भाग्याचा


आपण आपल्यासाठीच खास

व्हावे कधीतरी बेफिकर 

निर्धास्त होऊन घ्यावा  

 निर्मळ मनाने श्वास  


 होऊनी बेफिकीर 

कधीतरी बाहेर रमावं

आवडता छंद जोपासून छानचं 

काहीतरी वाचावं, लिहावं 

स्वच्छंदी होऊन मोकळ्या 

आकाशात पक्षासम उडावं 

खट्याळपणे लाडात नाचावं 

हसत खेळत कधी खळखळून रडावं  

आयुष्य मनसोक्त जगावं अन् होऊन बेफिकीर कधीतरी

मनासारखं बागडावं..


शेवटी एवढेच...

 ना हो आज की फिक्र ना हो कल का डर 

बना खुद की हस्ती कुछ ऐसी की हो जाये तू बेफिकर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action