ती...
ती...
ती स्वप्नात आली एके प्रहरी
भरजरी वस्त्र नेसूनी कविता
रूप गोजिरे, अप्रतिम सुंदर
लावण्यवती ती माझी प्रियता
मजला उच्चारिले, का उदास?
तुझिया ध्येयाने मी तर भारली
माझी प्रेरणा सदैव पाठी तुझिया
चल आकांक्षा पूर्ण कर आपली
अदृश्य होऊनी, सुप्रभाती गमन
प्रेरणास्वरूपी साठलीया सहृदयी
लगेच मन झाले प्रवृत्त लिहिण्या
शब्दरुपी ओघ कंटात भराभर येई
स्फुरले शीर्षक मनकल्पित काव्य
लेखणी चमत्कारिक चाले भराभर
शब्दावर शब्द सुचत गेले स्व-मनी
कविता पूर्ण होत गेली सर सर सर
स्वप्नातील रम्य कविता साकारली
प्रत्येक्षी प्रगटलीया कागजावरती
बहू वर्षीय प्रतीक्षा कायमी संपली
जीवनात उतरली काव्यरागिनी ती