पावसाची सर
पावसाची सर
पावसाची सर
वसुंधरावरी
धोधो बरसली
सुखी शेतकरी
मनाला उभारी
सरीने मिळाली
शेती कामे सारी
करी शेतकरी
जमीन भिंगली
गंध दरवळे
पशुपक्षी सर्व
आनंदे विहरे
आकाशात नभ
दाटूनिया आले
वीज कडाडती
मोर थुई नाचे
रान हिरवळे
वृक्ष घेई झोके
निसर्ग खुलला
कोण तया रोके
इंद्रधनू दिसे
निळ्या अवकाशी
सप्त रंग छटा
मोहिते मनासी
