निसर्ग रम्य कोकण
निसर्ग रम्य कोकण
1 min
1.1K
निसर्गाच्या नदी खोऱ्यातून
जमलेय कोकणची वस्ती
हिरवेगार जंगल दाटीतून
फिरताना मौजमजा मस्ती
कोकणची माणसं साधी
एकत्रित नांदतात दारी
जन्मभूमीत माझं आयुष्य
इथेच स्थायिक माणसं सारी
कोकणला लाभलाय मंद
लाटेतूनी समुद्र किनारा
निवांत सागरात बसून
सगळीकडे असतो पसारा
कोकण आपला नटलेला
शहरापेक्षा सुखाने राहत
स्वर्गाहुन सुंदर आपली
लोककला सादर करीत
देव दर्शनासाठी भक्तांना
उभारली जातात देवस्थाने
मनामनांत श्रद्धेचे भक्तिभाव
सुखदुःखी देवाला घाले गाऱ्हाणे

