श्रावण सरी
श्रावण सरी
पावसानं झालं ओलं चिंब रान
श्रावणसरी स्वर्ग नटला छान
सुगंधी झाली फुलांनी धरती
ओलसर रंगानी भिजली माती..//१//
हिरवी झाली निसर्ग अवनी
कोवळी गंध भिजली धरणी
दवबिंदूने बहरला शेतमळा
इंद्रधनुची रंगात रंगली नक्षीकळा ...//२//
मंजुळ वाऱ्याची झुळूक
कशी डोलते हवेत हळुवार
तिच्या संगे मोर पिसारा
फुलवत दिसतो किती छानदार..//३//
कोकिळेची मधुर वाणी
किलबिल करती पाखरे सारी
मखमली साज रंगेबिरंगी
शोभून दिसती घराच्या दारी...//४//
श्रावण सरी हा ऋतू वेगळा
मनसोक्त आनंद देतो खरा
ऊन सावलीचा पाऊस वारा
भिजताना अंगी येई शहारा...//५//