STORYMIRROR

प्रविण कावणकर

Children Stories Drama

3  

प्रविण कावणकर

Children Stories Drama

काय कमवायच पैसा की माणसं

काय कमवायच पैसा की माणसं

1 min
202

हल्लीच्या युगात माणूस पैसा

पैसा करत गर्दीच्या मागे धावतोय 

पोटाची खळगी भरता भरता

माणसं मात्र विसरत जातोय....//१//


हवा तसा संसार सांभाळत 

नात्यात दुर्लक्षित करून राहतोय

स्वतःवरचा विश्वास तोडून

वळून सगळं आयुष्य पाहतोय......//२//


हे जगणं असं महागाईच

दिवसेन दिवस वाढत जातय

बंदिस्त झालेलं उघड दार

डोळे उघडून पाहत जगतोय.....//३//


ओळख पटवून द्यायला

हरवत चालली जवळची माणसं

कुठवर सहन करत रहायचं 

ऐकोप्यान रहा पहिल्या सारखं....//४//


दुसऱ्याच बघता बघता स्वतःच

सगळं संपल्या सारखं वाटतं जातय 

पैसा कितीही कमवत राहिलात

तरी माणसामधलं प्रेम संपत जातय ......//५//

 

उरल नाही माणसाचं जीवन 

भरकटला जातोय धुंदीत राहुन 

काय कमवायच पैसा की माणसं 

ज्याने त्याने दिलं सर्व सोडून.....///६//


Rate this content
Log in