वेड प्रेमाचं
वेड प्रेमाचं
1 min
143
तुझ माझं नातं
जोडलं गेलं दोघांच
प्रेमरूपी तुझं सौंदर्य
वेड लागलंय प्रेमाचं...//१//
जीव तुझा नी माझा
होतोय स्पर्श मनाला
हळुवार क्षण नव्याने सारे
प्रीतीचा छंद जडला..//२//
प्रेमाचा सुटलाय वारा
तुझ्यात जीव गुंतून गेला
अधुर स्वप्नाची चांदणी
तुझाच चेहरा हसरा खुला..//३//
मन तुझ्यात झालं बेधुंद
मनाची झाली तगमग
तुझ्या भेटीचा आनंद
फिरत राहिलो माग लगबग..//४//
वेड होत तुझं दुरून
पाहतो तुझ्या आठवणी
लाल गुलाबाच्या फुलाची
जमली गाठ प्रेम कहाणी...//५//