आठवणींत राहिलेल बालपण
आठवणींत राहिलेल बालपण
आठवले मजला बालपण
कसं शोधू कुठे पाखरांना
यशाच्या शोधात धाव घेत
सारे जण विसरले एकमेकांना .... !!
रम्य ते निरागस बालपण
आता आठवणीत उरले
सोबतीने खेळ खेळलेले
भोवतेक विसरूनी गेले .....
पुन्हा नव्याने ओळख करता
जिवाभावाची मैत्री जमलीही
बालपणाची संगत रंगत
गोडी पुन्हा नव्याने गुंफली .....
वर्गात केलेली खोडकर
ती बँचवरची मजा मस्ती
हसत खेळत रमून जायची
मात्र तासाला यायची सुस्ती .....
खेळ खेळलो रस्सी उडी
लगोरी लपंडाव अंगणी
विटीदांडू चेंडू फळीचा
डाव रंगला शानदार मैदानी ......
सुट्टीचा दिवस जायचा
नदी किनारी पोहायला
हिरवेगार डोंगर भरलेलं
रानमेवा आस्वाद घ्यायला ...

