STORYMIRROR

प्रविण कावणकर

Children Stories Drama Fantasy

3  

प्रविण कावणकर

Children Stories Drama Fantasy

बालपणीची शाळा

बालपणीची शाळा

1 min
143

पाठीवरती दप्तर घेऊनी

शाळेत निघालो शिकायला

फळ्यावर खडू गिरवत

लागली भाषा कळायला../1/


मस्ती खोड्यांची कमाल

दणका रोजच्या तासाला

वर्गात बसून अभ्यास चाले

ज्ञानाचे धडे देत लिहायला../2/


दुपार जायची संगतीने

मित्रान सोबत जेवताना

मजा वाटे प्रत्येक जण 

भान हरवून जात खाताना../3/


रमून जायचो शाळेच्या

पटांगणात खेळ खेळायला

उदास झालेलं मन तेव्हा

बाहेर फेरफटका मारायला../4/


हसत खेळत दिवस पूर्ण

शाळेचा संपून जायचा

घरी परत जाण्यास घाई 

माझ्या जिवाला चिंतेचा../5/


Rate this content
Log in