पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
1 min
143
तुला पाहिलं मन झालं
वेड बावर पाहताना तुला
काय करावं सुचत नव्हत
कशी गाथा सांगू जीवाला..॥१॥
कधीतरी आपली सोबत
व्हावी मनात ठरवल होत
तुझ येणं जाणं माझ्यासाठी
मनाला लाख मोलाचं होत...॥२॥
नव्याने ओळख करता
जिवाभावाची मैत्री जमली
तुला सांगताना मनातलं
सगळं काही विसरून गेली..॥३॥
भेटगाठ झाली आपली
हि संगत सुखकर जीवनाची
मनाची कासावीस जुळली
तुझ्या माझ्या विरह प्रेमाची ..॥४॥
मन मोकळं तुझ्यासोबत
जपणार एकांतात असणार
कधीतरी सांगेन तुला माझं
जन्मोजन्मीच नात जीवनभर...॥५॥

