प्राणवायू
प्राणवायू
गर्भारली वसुंधरा
जन्मा आले वृक्ष प्राणी
संगोपन होण्या देई
प्राणवायू अन्नपाणी !!१!!
निसर्गात सहाय्यते
धावी पंच महाभूते
संवर्धन समतोल
जोडी सजीवांशी नाते !!२!!
प्राणवायू मानवास
फुकटात दिनरात
श्वास अखंड घेऊनी
जीव सारे जगतात !!३!!
धाव घाली वृक्षावर
नाही भविष्याची किव
मारे कुऱ्हाडीचा वार
घेई अपुलाच जीव !!४!!
कारखाने उभारून
झाले वायु प्रदूषण
खाणी इंधने शोधून
केले स्वतःचे स्मशान !!५!!
वन वृद्धी सिमेंटची
नाही तिथे शुध्द हवा
जल छाया मिळण्यास
झाडं लाव रे मानवा !!६!!
भान जरासे राहू दे
जरी सोबती विज्ञान
मनुजा जग जीवन
निसर्गाच्या नियमानं !!७!!
