तहान
तहान
वीतभर पोटासाठी
मिळावयास भाकरी
धनिकाच्या शेतामंधी
मायबापाची चाकरी
उघडी नयन पाहती
नको नको ते रे हाल
सरली ताकत देहाची
नसे पावलातही चाल
जिद्द दाटली मनात
शिकू लागलो शाळा
स्वकष्टाच्या बळानेच
जिंकलो विजय माळा
घडा ज्ञानाचा भरूनी
पुसलो अज्ञानी धब्बा
खेळ संपला दारिद्री
झालो स्वबळावर उभा
न पुसणारे ही आता
देऊ लागलेत सन्मान
जिज्ञासेने मज घडविले
तिचा मला रे अभिमान
नव युवकांनो तुम्हास
अशीच लागावी तहान
नशिबास दोष देवूनी
कोणी होत नसे महान
