STORYMIRROR

Anil Ambatkar

Others

3  

Anil Ambatkar

Others

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन

1 min
441

वृक्ष आमुचे सखे सोयरे

देती प्राणवायू अन्नपाणी

धरणीवरचे आश्रीत सारे

नांदती सौख्य समाधानी


वृक्षावर घातल्या कुऱ्हाडी

उजाड केलेत घनदाट रान

तुटून गेले निसर्ग संतुलन

पडले पर्यावरणावर ताण


औद्योगिक क्रांतीनेच जगी

पाय पसरले वायू प्रदूषण

विश्व तापमान वृध्दी करती

खाण पेट्रोल डिझेल इंधन


झाली वन वृद्धी सिमेंटची

अंतर्धान पावली शुध्द हवा

नित्य जीवघेणा कोंडमारा

तिथं चालेना रोगावर दवा


अंगार फुस्कारता चंडाशू

झरे नद्या विहिरी आटती

दुष्काळात पिकेना शेती

बघून सारे हृदय फाटती


सदा छळ मांडूनी निसर्गाचा 

समीप आला अंताचा धागा

निसर्ग नियमानं जगायला तू

मानवा शीघ्रगती हो रे जागा


झाडे लावा झाडे जगवा

साऱ्यांनी घ्या एकच ध्यास

पर्यावरण संवर्धन हाच आहे

भविष्याचा अंतिम श्वास


Rate this content
Log in