STORYMIRROR

Anil Ambatkar

Others

4  

Anil Ambatkar

Others

माझा बाप

माझा बाप

1 min
194

बाप वटवृक्षाची शितल छाया

काटेरी फणसाचा मऊमऊ गर

सदनाचा पाया परिवाराची ढाल

असा राही उभा पाठीशी खंबीर


नित्य दिनरात राबून राबून

उन्ह पावसातही करे चाकरी

भुकेल्या पोटा आम्हा चारल्या

चिंब घामाने भिजल्या भाकरी


घेऊन खांद्यावर टिकास फावडे 

पहाटेस माती कामावर जाय

चार कोस चालूनिया अनवाणी 

रक्तबंबाळ होई भेगाळले पाय


स्वप्नांचा महाल बांधूनी उरात

दावियली विद्या मंदिराची वाट

शिणलेला देह गृही आल्यावर

सांजवातीस घेई अभ्यास पाठ


सकल वेदनांचे काहूर साठवी

अंतरी बाप माझा अपुल्या पोटी

लेकरांच्या सुखा झिजवून काया

जगी बाळ केली किर्तीवान मोठी


श्रीफळाच्या डोलावाणी पिता

असे त्याची आम्हा पाठीवर थाप

हे परमेश्वरा तुज मागणे एक

असा लाभावा जन्मोजन्मी बाप


Rate this content
Log in