STORYMIRROR

Anil Ambatkar

Inspirational

3  

Anil Ambatkar

Inspirational

माझी मराठी शाळा

माझी मराठी शाळा

1 min
285

दऱ्या खोऱ्यात वसली

माझी मराठीची शाळा

गाव गाड्यातल्या बाळा

तिने लावीयला लळा  !!१!!


बाई गुरुजी आमुचे

जशी प्रज्ञावंत खाण

रान जीवाचे करुनी

देती मातेसम ज्ञान    !!२!!


आस धरुनी शाळेची

ज्ञानार्जना येती पोरं

प्रकाशण्या पूर्ण चंद्र

विद्या घेती कोर कोर  !!३!!


दीन मागास विद्यार्थ्या

देती गणवेश दोन

सत्वयुक्त डाळ भात

घेती मध्यान्ह भोजन  !!४!!


शारीरिक कसरती

नित्य नवे परिपाठ

सदाचार संस्कारांने

दावी माणूसकी वाट  !!५!!


शाळा शिकली मराठी

झाले अधिकारी पोरं

दिसे नाना पदावर

कुणी राज तख्तावर  !!६!!


माझी मराठीची शाळा

जशी शिल्पकार लेक

बालकाच्या भविष्यास

देते आकार अनेक   !!७!!


विद्या विकास मंदिर 

आम्हा गावची रे शान

तिचा उद्धार करण्या

देऊ नाना परी दान   !!८!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational