जीवन म्हणजे काय
जीवन म्हणजे काय
जीवन म्हणजे काय ते
जगल्याशिवाय कळत नाही
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग
झाल्याशिवाय कळत नाही
सुख म्हणजे काय ते दुसऱ्यांच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही
मैत्री म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही
विश्वास म्हणजे काय ते स्वतः वर असल्याशिवाय व
संपादन केल्याशिवाय कळत नाही
आपली माणसं कोण..?
संकटांशिवाय कळत नाही
सत्य म्हणजे काय ते उघडल्याशिवाय कळत नाही
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही
जबाबदारी म्हणजे काय ते
सांभाळल्याशिवाय कळत नाही
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही
प्रेम आपुलकी जिव्हाळा म्हणजे काय
ते नाती जपल्याशिवाय कळत नाही...
एकमेकांशी संवाद साधल्या शिवाय
हरवलेले उत्तर सापडत नाही
समजून सारं वागलं की काही चुकत पण नाही
आणि स्वतः अनुभवल्या शिवाय काही कळत पण नाही
म्हणूनच
बाजूला सारला जाईल जेव्हा स्वार्थ
वसेल हृदयात जेव्हा सर्वांच्या निस्वार्थ
स्वतः सोबत होईल विचार सर्वांचा
समजून सारं वागलं की न चुकण्याचा
तेव्हाच कळेल खरा अर्थ जीवनाचा.... 😊
