अवघड घाट
अवघड घाट
वाट अवघड जीवनाची
जीवनाची संस्कार शिदोरी
सोबतिला ठेवुनिया राहू
राहू आनंदाने बिनघोरी.....!!
मस्त मजेने जगून घ्यावे
घ्यावे परोपकाराचे दान
सुखदुःख जरी सोबतीला
सोबतीला रे पसायदान.....!!
होवू नको तू लाचार कधी
कधी करू नको बेइमानी
आचरण शुद्ध मनी ठेव
ठेव सोबत थोडी इमानी....!!
सेवा करावी वृध्दांची थोडी
थोडी लागेल तुला रे गोडी
अवघड वाट जरी तुझी
पुढे जाईल रे तुझी होडी....!!
भुकेलेल्या अन्न द्यावे कधी
कधी साधावा रे परमार्थ
तुझ्या जीवनाला मिळेलच
मिळेलच तेव्हा खरा अर्थ....!!
