पावसाची कुण-कुणी
पावसाची कुण-कुणी
प्रकृतीचे चक्र स्वनियमाने चालते,
ऋतु-दर-ऋतु हवामान सारखे बदलते.
प्रत्येक ऋतुचा गंध वेगळा कां असते?,
कारण सकाळ-संध्या मध्ये अंतर असते.
तपलेल्या मातीचे चटके सर्वांना भासते,
उन्हाचे फटके मन कासाविस करते.
पावसाच्या काही सरीचे आगमन होते,
मातीच्या सुगंधाने मन मनोहर होते.
अर्धमृत वृक्षांना संजीवनी मिळते,
शेतकरांचे डोळे आभाळाला भिडते.
बळी राजाच्या जीवात जीव येते,
जेव्हा पावसळ्याची सुरुवात होते.
जीव-जंतुना प्रकृतिचे चक्र समजते,
वंशाला टिकवीन्याची धडपड कां असते?.
पावसाळाच जनन प्रकियसाठी पोषक असते,
तपलेल्या भूमिची आग फक्त पाणीच मिटवते.
पावसाचा मृदगंध सगळ्यांना हवा असतो,
त्याच्याच आगमनाने अर्थचक्र चालते.
उन्हाळी मानसुनची वक्रदृष्टि जेव्हा पडते,
प्रत्येकाचे अर्थचक्र, जीवचक्र जागेवरच थांबते.
