जगूया जीवन आनंदानं ..!
जगूया जीवन आनंदानं ..!
माणसांनो आपण सर्वांनी
जगूया जीवन आनंदानं ,
संकटांना सामोरे जाऊन
जीवनाचं करूया सोनं .
जीवन समुद्र आहे
संकटांनी भरलेला ,
त्या समुद्रात आनंद
आपला दडलेला .
प्रत्येक गोष्टीत आनंद
हा लपलेला असतो ,
दुःखी राहून आपण
आनंद गमावून बसतो .