आला पावसाळा
आला पावसाळा
आला आला पावसाळा
पेरणीला चला जाऊ
खते, बियाणे घेऊन
लवकर चल भाऊ....!!
आला आला पावसाळा
मनी आनंद मिळाला
तहानल्या जमिनीला
जणू प्राण रे मिळाला....!!
आला आला पावसाळा
हिरवं सपान पाहू
पीक डोलेल ग रानी
त्यासाठी कष्ट साहू.....!!
आला आला पावसाळा
मेघ भरून रे आले
जमिनीचे पोट भरले
मन उत्हासाने डोले....!!
आला आला पावसाळा
बरसतील सावनसरी
सानथोरासवे नाचतील
येता पावसाच्या सरी......!!
