निसर्ग वैभव
निसर्ग वैभव
वनी जीवनी थंड हवेचे गारवे
शेत फुल- फुलुनी दिसत हिरवे
नाही येथे कोणत्याचा रोगाचे भेव
संजीवनी आहे निसर्ग वैभव
येथे येऊनी माणूस आपल्या दुःखी जीवनात हसते,
झाडे- झुडपे नदी ओहळ हेच निसर्ग वैभव असते
येथे नाही प्रदूषणाची घाण
फक्त रंगीबीरंगी पाखरांचे गाण
सर्व प्राण्यांचे वास्तव्य आहे वन
जन्मापासून येथेच त्यांचे जीवन
