STORYMIRROR

Jay Jalit

Inspirational

3  

Jay Jalit

Inspirational

उत्सवाची दिवाळी

उत्सवाची दिवाळी

1 min
142

आई म्हणजे लक्ष्मी, वडील म्हणजे विष्णू त्यांचा

आशिर्वाद मिळवण्यासाठी तो क्षण नका घालू व्यर्थ, 

करंज्या, लाडू, शंकरपाळे, शेव,चकल्या, चिवडा, 

दिवाळीला फराळाला हेच असेल पदार्थ....//1//


अभ्यंग स्नान, नवे कपडे घालूनी, 

आई छान छान करी तयार बाळा, 

तेज दिसे सर्वांच्या चेहऱ्यावर

आनंदाचा आणि हा दीपोउत्सवाचा सोहळा.... //2//


धन संपत्ती आणि सर्व देवांचा, 

सामावेश करुनी लक्ष्मी पुजा

या दिवशी प्राप्त होते, 

सकारात्मक नवीन अशी ऊर्जा.... //3//


दीपावलीच्या पाडवा, 

सर्व गाय एकत्र येऊनी खेळ खेळी, 

प्राण्यांचा ही सामावेश असतो, 

असा उत्साहाचा सण दिवाळी.... //4//


यम व्दितीय भाऊबीज दिवशी, 

बहिण भावाला ओवाळी, 

भाऊ भेट देतो बहिणीला साडी, 

अशी ही नात्यात गुंफून जाणारी दिवाळी.... //5//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational