STORYMIRROR

rajashree Wani

Action Inspirational

3  

rajashree Wani

Action Inspirational

शब्दरजनी गंधाळला

शब्दरजनी गंधाळला

1 min
215

शब्दांचे लावण्य अलगद

कसे कागदावर रेखाटतात

मनाच्या गाभऱ्यातील खोल 

भावना साक्षात उमटवतात..


शब्दांचे सौंदर्य लेखणीला

भारदस्त सुरेख ते बनवते 

गंधाललेली शब्दरजनी वाट

सुगंधी विचारांना दाखवते ..


जीवनाच्या सागरी किनाऱ्याला

लेखणी सदैव माझी संगती

शब्दसुमनांचा संचय हृदयातून

काव्यरूपी माळ बनून तरंगती..


स्वछन्द शब्द सखे सोबती

उंच नभांगणी भरारी घेती

शब्द चांदण्या बनून समूहात

साक्ष उत्कर्षांची करून देती..


वेदना या मनाच्या आतील

नयनी अश्रू हृदयी दाटती

भावानांचा बांध फुटूनी त्या

प्रहार साहित्यातुनी करती..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action