Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nandini Menjoge

Action Classics Inspirational

3  

Nandini Menjoge

Action Classics Inspirational

ध्यास...

ध्यास...

1 min
203


स्वच्छता असावी सगळीकडे 

घरात कचरा नको गडे

नांदावा सर्वत्र सुवास.. 

मानवा घे मनी ध्यास ||


पाण्यात जीव गुदमरतो 

दर श्वासाला तडफडतो 

निर्मळ व्हावी नद्यांची वाट.. 

मानवा घे मनी ध्यास ||


प्रदूषणाचा ठरवावा अंत 

यंत्राचे गुलाम आपण ही खंत 

सुयोग्य वापर हा संकल्प.. 

मानवा घे मनी ध्यास ||


हिरवे सौन्दर्य हे बहुमूल्य 

जंगलांचा न व्हावा र्ह्यास 

प्रत्येकाला वृक्षांचा सहवास..

मानवा घे मनी ध्यास ||


लक्ष्मीचा सहवास लाभेल 

प्रफुल्लित धरणी हसेल 

निश्चय करू हा हमखास.. 

मानवा घे मनी ध्यास ||


Rate this content
Log in