जीवन म्हणजे काय
जीवन म्हणजे काय
✨ जीवन म्हणजे काय?
शेवटी एक गणितच तर आहे
आजवर कुणाला चुकले,
खरे बेरीज, वजाबाकी सगळे या
व्यवहारी जीवनातचं शिकले....
जीवनाचे गणित आहे थोडे अवघड, त्याला नेहमी सकारात्मकतेने बघावे,
जिद्द आणि चिकाटीने
पाहिजे तसा योग्य आलेख
आपण स्वतःच आखावे ..📝
दुःखाला भागुन सुखाचे
गुणाकार करावे,
कधी लसावी तर कधी मसावी करून,
टप्प्याटप्प्याने त्याला सोडवावे...
अन् पदरी आपल्या फक्त
अनुभवी सुविचार बांधावे ...
जीवन असो कसेही आनंदाने जगावे...
जीवनात प्रेमाच्या, आपुलकीच्या नात्यात
चुकांचे मोजमाप नसावे,
एकमेकांना नेहमी समजून घेवूनचं जगावे,
झालेच कधी गैरसमज त्याचे पारडे जड नसावे
एकत्र येऊन थोडं परस्पर बोलून
झालेले गैरसमज दूर करून घ्यावे....
नात्यात चढाओढीचे गणित न ठेवता
जीवनाचे कोडे सोडवत जावे,
जीवनाच्या वर्तुळातील केंद्रबिंदू शोधून काढावे ,
जीवनाचे ध्येय ठरवून, लक्ष केंद्रित करून
आपणच आपल्या ध्येयाचा पल्ला गाठावे.....
जीवन गणित आहे थोडे अवघड,
त्याला सकारात्मकतेने बघावे......✨🙏🙏
