मैत्री
मैत्री
एक अनोखं बंधन ,
थोडा रुसवा, थोडा फुगवा,
थोडं हसू ,थोडी चेष्टा,
थोडी मजा ,थोडी मस्ती,
थोडी एकी ,थोडी स्पर्धा,
कसे सरतात दिवस ...
नाहीच कळत...!
मग...
एक वेळ येते;
या साऱ्या जगात ,
एकटं वावरण्याची...!
भीती वाटते पुन्हा...
आपण एकटे आहोत ;
की काय?याची...!
मग पुन्हा सुरुवात होते
एका नव्या मैत्रीची...!
मैत्री...एक अनोखं बंधन,
बंधमुक्त अन् हवंहवंसं ...!
