एक किरण आशेचा
एक किरण आशेचा
1 min
441
💫💫💫💫💫💫💫💫
एक किरण मजला
मिळो आशेचा जरासा
करी सुवर्णाक्षरांनी
सुरूवात हा भरोसा
💫💫💫💫💫💫💫💫
करी दोन हात जणू
असे मग संकटाशी
मिळे आनंद मनाला
असे खात्री ती मनाशी
💫💫💫💫💫💫💫💫
जाऊ सारे पुढे पुढे
घडो उज्ज्वल भविष्य
नको नकारात्मकता
नको कुठचे नैराश्य
💫💫💫💫💫💫💫💫
असे खूप मोलाचा
एक किरण आशेचा
मिळे कलाटणी मग
मार्ग सुरू तो यशाचा
💫💫💫💫💫💫💫💫