STORYMIRROR

Shamal Kamat

Action Inspirational

4  

Shamal Kamat

Action Inspirational

आधुनिक महिला

आधुनिक महिला

1 min
215

नाही मी निर्भया,

पुरुषी अत्याचाराला बळी नाही पडणार,

आत्मनिर्भर बनून सर्वांशी मी लढणार


नाही मी गांधारी,

डोळ्यावर पट्टी नाही बांधणार

सतत डोळे उघडे ठेवून, अधर्माचा नाश करणार


नाही मी कुंती,

फसवले जरी तू मला, तरी लेकराला नाही उघड्यावर टाकणार

स्वत:चे नाव देऊन वाढविणार


नाही मी द्रौपदी,

पदरात जरी हात घातला,

तरी नाही मी गप्प बसणार

कुंग्फू-कराट्याचा धडा तुला मी शिकविणार


नाही मी सीता,

लोकनिंदेला नाही मी घाबरणार,

नाही कुठली अग्निपरीक्षा देणार

स्वत:चे सामर्थ्य वाढवून स्वंयसिद्धा बनणार


आधुनिक काळातील महिला मी नाही कुठला अन्याय अत्याचार सहन करणार

महिषासुरमर्दिनी बनून कलीयुगातील दैत्यांचा संहार करणार

ताठ मानेने आत्मविश्वासाने जगणार

समस्त महिलांनाही तसेच जगायला शिकविणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action