शपथ स्वराज्याची
शपथ स्वराज्याची
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
स्वराज्य स्थापन करण्याची
घेतली शपथ माझ्या शिवबानी
केला प्रराक्रम महाराजांनी
लढाई लढण्या होता खंबीर
नव्हती पर्वा मरणाची
संगं होते मावळे शंभर
स्वराज्य स्थापन करण्याची
घेतली शपथ माझ्या शिवबानी
मावळे घेऊनी संगे सोबती
गड - किल्ल्याच्या रक्षणासाठी
लढाईचे घेतले होते शिक्षण
शत्रुचा संहार करण्यासाठी
स्वराज्य स्थापन करण्याची
घेतली शपथ माझ्या शिवबानी
हाती घेऊन भवानी तलवार
टाच मारून बसुनी घोड्यावर
सह्याद्रीच्या दऱ्या - खोऱ्यात
उभा खंबीर शत्रुच्या वाटेवर
स्वराज्य स्थापन करण्याची
घेतली शपथ माझ्या शिवबानी