प्रेम करा पण कुणावर करावे
प्रेम करा पण कुणावर करावे
प्रेम करा पण कुणावर करावे
जे आपल्यावर प्रेम करतात
ज्या आईने नऊ महिने उदरात
ओझे वाहून जन्म दिला त्या आईवर प्रेम करा...?
जे कधी स्वत: पाहिलं नाही बघता आलं नाही
त्या व्यक्तीने स्वत:च्या खांद्यावर घेऊन पोराला
जग दाखवले त्या बापावर प्रेम करा...?
जन्म घेऊन मायभूमीचं रक्षण करतात
त्या सीमेवर दिवस-रात्र प्राण त्यागतात
त्या लढणाऱ्या जवानावर प्रेम करा...?
सुंदर फुल फुलणाऱ्या काट्यात
गुलाबाची नाजूक कळी खुलते
त्या गुलाबाच्या वेलीवर प्रेम करा ...?
आयुष्यभर जीवनात जीवंत राहण्यासाठी
तो आॅक्सिजन प्राणवायु झाडे देतात
प्राणवायु देणाऱ्या झाडावर प्रेम करा...?
गावातील संगतीने पोर खेळत होती
शाळेत सोबत शिक्षण शिकली ते मित्र
त्या जिवापाड जपणाऱ्या मित्रावर प्रेम करा...?
जी काल परवा आयुष्यात आलेली मुलगी
ती कधीही सोडून निघून जाईल अशा मुलीवर...?
आयुष्यभर साथ निभावणाऱ्या अर्धांगिनीवर प्रेम करा...?
ज्या शाळेत शिक्षण शिकून मोठं ज्ञान मिळवलं
त्या शिक्षणाचे महत्व जाणवून देणारे गुरूवर्य
त्या शाळेतील ज्ञानीगुरूवर प्रेम करा....?
