बेधुंद झाले मी प्रेमात
बेधुंद झाले मी प्रेमात
मला नाही जगावंसं वाटत तुझ्याशिवाय
कस सांगू तूला जीव जडलाय रे तुझ्यात
मी जास्त विचार करणं सोडलंय आता
बेधुंद झाले रे मी साजणा तुझ्या प्रेमात ,,धृ,,
रहावत नाही आता मला तुझ्याशिवाय
एक क्षणभरही मन लागत नाही माझं
कशी जादू केली वेड्या तू माझ्यावर
माझ्या प्रितीत साजणा मन बहरले तुझं ,, १ ,,
तुझ्या प्रेमाच्या खेळात डुंबून गेली रे मी
प्रित करून माझ्याशी दूरवर जाऊ नकोस
नाही जगू शकणार मी तुझ्याशिवाय राजा
जिकडे तिकडे पाहते जेव्हा होतो तुझाच भास ,, २ ,,
झोपेतही तुझीच स्वप्न रंगतात माझ्या
अंधाऱ्या रातीत चांदण्या दिसे आकाशात
नभ दाटून आले नाही तरी अश्रू वाहून जातात
संथ वाहणारा ओढा त्यात अश्रू समावून वाहतात ,, ३ ,,
नाही जगावंसं वाटत आता तुझ्याशिवाय
का सोडून गेलास प्रित माझी जीवनात
मी जास्त विचार करणं सोडलंय आता
बेधुंद झाले रे मी साजणा तुझ्या प्रेमात ,, ४ ,,

