STORYMIRROR

Avinash Pawar [Avish]

Romance

4  

Avinash Pawar [Avish]

Romance

साजनी तुह्या प्रेमात रंगून

साजनी तुह्या प्रेमात रंगून

2 mins
351

खळी खुलली तुझ्या गालावर

हसू उमटले गुलाबी ओठावर 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज 

प्रेमाच्या रंगात भिजून गेलं अंग!!१!!


दिसभर फिरत होतो तुझ्या मागं मागं 

एकदिवस पडशील तू गं माझ्या प्रेमात 

अंगणात चिमणी दाणे टिपते चोचीत 

तुला प्रेमानं गं राणी घेईन मिठीत 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज

प्रेमाच्या रंगात भिजून गेल अंग!!२!!


काय डाव टाकला तू पडलो मी विचारात 

आठवणीत तुह्या करतो रात रात जागरण

स्वप्नात येई तू माझ्या गोड झोपेत 

खुलून येई बहर चांदण्या रातीत

पडलो मी आशु तुह्या कसा गंप्रेमात 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज

प्रेमाच्या रंगात भिजून गेल अंग!!३!!


एकटक नजर होती तुह्या खिडकीवर 

वाट बघत होतो तुझी उभा राहून दारात 

भेट होईन एकदाची बोलेन प्रेम करतो तुझ्यावर 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज.

प्रेमाच्या रंगात भिजून गेल अंग!!४!!


खळी खुलली तुझ्या गालावर

हसू उमटले गुलाबी ओठावर 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज 

साजनी तुह्या प्रेमात रंगून गेलो आज 

प्रेमाच्या रंगात भिजून गेल अंग!!१!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance