भेट कॅालेजची
भेट कॅालेजची
आज भेटली तू मला काॅलेजच्या कट्ट्यावर
तुला बघताच माझा ताबा नाही राहीला माझ्यावर,
एकसारखी ती पाहत होती
माझ्यावर ती एकटक नजरेनं मरत होती
सोडून आज मला का गेलीस दूरवर,
खूप दिवसांनी तिला मी आज पाहिलं
तिचं हॄदयाचा तुकडा माझ्याकडे राहीलं
मारूनी हाक तिला विश्वास बसेना डोळ्यावर,
मन प्रसन्न झाले तिला मी बोलल्यावर
हास्य पाहुनी तिच्या मी चेहऱ्यावर
खळी खुलली तिच्या गाोड गाालावर,
प्रेम पाहुनी तिचं माझ्यावरती
भान हरवले मी माझ्या प्रेमावरती
पाहुनी कातील अदा तिची झाले डोळे नशवर,
सांग प्रेमाला माझ्या तू देशील साथ
तुझ्या आठवणीत कशीबशी सरते रात
नाव A खडूस तुझं कोरून ठेवलंय मी माझ्या काळजावर,
आज बेभान झाली काॅलेजचे पोर-पोरी
तुझ्या न माझ्या प्रितीची भेट पाहील्यावरी
अविची ही अनोखी शेवटची भेट काॅलेजवरी...

