मुलगी जन्माचा गुन्हा
मुलगी जन्माचा गुन्हा
काय गुन्हा आहे हो माझा
मुलगी म्हणून जन्माला आले
सांगा ना आई-बाबा काय झालं
एवढंच ना मी मुलगी म्हणून जन्माला आले…
काय गुन्हा आहे हो माझा
मुलगी म्हणून जन्माला आले
म्हणतात मुलगी झाली की घरामधी
लक्ष्मी सोनपावलाने घरी येते
मग का नाकारता मुलीला तुम्ही
ती जेव्हा घरी जन्माला येते…
काय गुन्हा आहे हो माझा
मुलगी म्हणून जन्माला आले
मुलगी म्हणून जन्माला आले तरी मी
या समाजात सुरक्षित का बरं नाही
सुखी जीवन जगतानापण सुद्धा
मी या जगात सुरक्षित का बरं नाही…
काय गुन्हा आहे हो माझा
मुलगी म्हणून जन्माला आले
जगू द्या मला पण या जगात सुखाने
का घडतात मग बलात्कार/अत्याचार
शिक्षण शिकून द्या मला शाळात
का देत नाही मला सुखाने जगण्याचा अधिकार
काय गुन्हा आहे हो माझा
मुलगी म्हणून जन्माला आले
