माझ्या शिवबाराजाची जयंती आली
माझ्या शिवबाराजाची जयंती आली
आली आली आली 19 फेब्रुवारी
माझ्या शिवबाराजाची जयंती आली
जगात साऱ्या साजरी होई $$
डोक्यावरती भगवा झेंडा आमच्या
कपाळी शोभतेय चंद्रकोराची शान
गळ्यात माळ मोत्याची शोभून दिसतेय छान
आली आली आली 19 फेब्रुवारी
माझ्या शिवबाराजाची जयंती आली $$
माॅं जिजाऊमातेचा पुत्र शिवाजी
माॅं तुळजाभवानी मातेचा भक्त शिवाजी
घेतली शपथ स्वराज्य स्थापन करण्याची $
माझ्या राजाची माझ्या शिवबा राजाची
जयंती हो आली, शिवजयंती हो आली $$
भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन
दिल वरदान भेट तलवार देवून
मर्द मराठीमाती मातीचा, पैलवान पोलादी छातीचा
अंगी शंभर हत्तीचं बळ, पाहुनच सैतान पळ $
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात नाद एकच रं गाजे
कृष्णा घोडीच्या टाचेचा आवाज निनाद रं वाजे
माझ्या राजाची माझ्या शिवबा राजाची
जयंती हो आली, शिवजयंती हो आली $$
मुठभर मावळे होते संगतीला,
मुघल थरथर कापे तलवारीला
गड जिंकायला मावळे करती गनिमी कावा
तानाजी लढाई लढण्या होता खंबीर, रक्षणाला होता जिवा,
गड जिंकल्यावर नाद ढोल ताशाचा तुतारीचा स्वर
हर हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव
आली आली आली 19 फेब्रुवारी
माझ्या राजाची माझ्या शिवबा राजाची
जयंती हो आली, शिवजयंती हो आली $$
जय जिजाऊमाता, जय शिवराय,
जय शंभूराजे, जय गडकोट...
