तिच्या फोटोची गॅलरी
तिच्या फोटोची गॅलरी
ए, माझ्या प्रितीच्या फुलपाखरा
खूप जीव आहे रे माझा तुझ्यात
तुझा पण आहे का रे जीव माझ्यात
तुझेच चित्र असते माझ्या डोळ्यात
जेव्हा बघतो मी फोटो आठवण येती तुझी
फोन माझा असला तरी गॅलरी तुझीच आहे
रुप निखारूनी सजतेस तू जशी रूपसुंदरी
कंठभोवती साज तुझ्या शोभते मंदारकीनी वाहे
प्रिये नजराणा तुझा आहे देखणा डोळा
वाकड्या नजरेने करतेस इशारा
नजरेनं जखमी झाला हा आशिक दिवाना
तुझ्या आठवणीत वाहतात डोळ्यातून अश्रुच्या धारा
भेट झाली तेव्हा प्रतिबिंब कैद केलं कॅमेरात
पुन्हा कधी भेटल्यावर देईन तुला मी फोटो गॅलरी
माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात साचल्या तुझ्या आठवणी
फोन कवी अविचा असला तरी त्यात तुझीच आहे चित्रनगरी

