रेशीम बंध प्रेमाचा...
रेशीम बंध प्रेमाचा...


रेशीम बंध हा प्रेमाचा ...
नाही नुसत्या धाग्यांचा !
बंध हा बहिणीच्या जिव्हाळ्याचा...
अन् भावाच्या अनमोल वचनाचा !
बंध हा बालपणातील लटक्या रागाचा..
खोड्यांमधील आपुलकीचा !
बंध हा अंगणात रंगलेल्या डावांचा...
चिमणीच्या दाताने खाल्लेल्या खाऊचा !
बंध हा लाडीक मस्करीचा...
दोघांतील गूढ गुजगोष्टींचा !
बंध हा यशवंत भाऊरायाच्या अभिमानाचा !
अन् बहिणीच्या आठवणीतील अश्रूंचा !
बंध हा आईवडिलांच्या समाधानाचा...
त्यांच्या संस्कारांचा व अतूट विश्वासाचा !
माहेरच्या ओढीचा अन् मायेच्या गोडीचा !
बंध हा प्रेमाचा... एकमेकांच्या आधाराचा !
असा हा बंध भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा !