Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swati Chuttar

Others

4.0  

Swati Chuttar

Others

स्त्रीत्व वसुंधरेचे...

स्त्रीत्व वसुंधरेचे...

1 min
532

पाहिलंय मी वसुंधरेला तिचे स्त्रीत्व जपताना...

ऋतूंसवे जुळवून घेत नानाविध रुपे बदलताना !

सहा ऋतूंचे सारे नवसोहळे ती साजरे करते...

सौंदर्यासोबतच मनींचे भाव ही जणू बदलते !

कधी वरुणाच्या विरहात झुरताना मज दिसते...

अन् तो आला की त्याच्या भेटीने मोहरून जाते !

कधी श्रावणाच्या खेळात लाजरी नववधू ती भासते ...

तर गुलाबी थंडीच्या धुक्यात स्वतःतच हरवून बसते !

कधी सोसते मूकपणे ती पानगळ वेदनांची ...

कारण तिजला चाहूल लागते वसंत आगमनाची!

भान तिचे हरपून जाते मनोहर वसंतासवे खेळताना...     

 पाहिलंय मी वसुंधरेला तिचे आईपण मिरवताना !

Rate this content
Log in