प्रिय शाळा
प्रिय शाळा


तू आहेस म्हणूनच आज मी आहे ....
माझ्या अस्तित्वाची ओळखच तू आहेस...
तूच मला बालपणापासून मायेनं वाढवलं...
शिक्षणासोबत माझ्या कलागुणांना जोपासलं...
स्वावलंबी संस्कारक्षम असं व्यक्तिमत्त्व घडवलं...
आजही तूच तर आहेस माझ्या आयुष्याचा आधार...
तुझ्याच आशीर्वादाने झालीत माझी स्वप्ने साकार...
तुझी सेवा करणं हाच माझा ध्यास ...
अन तुझी सारी लेकरे हाच माझा श्वास...
मी शिक्षक असल्याचा मला आहे अभिमान...
सावित्रीची ही लेक राखेल सदा या व्रताचा मान.