आयुष्याचा कोरा कागद...
आयुष्याचा कोरा कागद...
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
काय लिहायचे, कसे लिहायचे...
लिहायचे की नाही लिहायचे...
ते आपणच ठरवायचे!
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
दुःख गिरवत बसायचे की...
आनंदाची सुंदर नक्षी काढायची...
ते आपणच ठरवायचे!
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
अधोगतीच्या रेघोट्या ओढायच्या की...
प्रगतीचा सुबक आलेख रेखायचा...
ते आपणच ठरवायचे!
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
दुःखाने भागून बाकी शून्यच ठेवायची की...
सुखांच्या क्षणांचा गुणाकार करायचा ....
ते आपणच ठरवायचे!
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
निराशेचे अश्रू ढाळायचे की...
आशेचे सप्तरंग भरायचे
ते आपणच ठरवायचे!
आयुष्याचा कोरा कागद
तसाच कोराच ठेवायचा की...
सत्कार्याने त्याला सजवायचा...
ते आपणच ठरवायचे!