स्त्रीत्व वसुंधरेचे...
स्त्रीत्व वसुंधरेचे...


पाहिलंय मी वसुंधरेला तिचे स्त्रीत्व जपताना...
ऋतूंसवे जुळवून घेत नानाविध रुपे बदलताना!
सहा ऋतूंचे सारे नवसोहळे ती साजरे करते...
सौंदर्यासोबतच मनींचे भाव ही जणू बदलते!
कधी वरुणाच्या विरहात झुरताना मज दिसते...
अन् तो आला की त्याच्या भेटीने मोहरून जाते!
कधी श्रावणाच्या खेळात लाजरी नववधू ती भासते...
तर गुलाबी थंडीच्या धुक्यात स्वतःतच हरवून बसते!
कधी सोसते मूकपणे ती पानगळ वेदनांची...
कारण तिजला चाहूल लागते वसंत आगमनाची!
भान तिचे हरपून जाते मनोहर वसंतासवे खेळताना...
पाहिलंय मी वसुंधरेला तिचे आईपण मिरवताना!