पाऊस... माझा मित्रच !
पाऊस... माझा मित्रच !


मृगाच्या पहिल्याच दिवशी तो मला अवचित भेटायचा...
इतके दिवस मात्र न जाणे कुठे असायचा?
मी लहान असताना तो बरसतच यायचा...
माझ्याशी दिवसभर मनसोक्त खेळायचा !
त्याच्यामुळे मी आईचा मार खायचा...
अन् हा मात्र तेव्हा खो- खो हसायचा !
शाळेत असताना त्याची नि माझी फारच होती गट्टी...
तो अंगणात आला की, माझी शाळेला सुट्टी !
बालपण सरलं तारुण्यात आले....
पण तो मात्र तसाच खट्याळ अन् अवखळ!
आता माझ्या मनातलं गुपित मी हळूच त्याला सांगायची..
त्यावर मात्र त्याने मात्र मला चिडवत उगा फिरकी घ्यायची !
माझ्या सुखदुःखाचा तोच आहे साक्षीदार...
त्याच्याच साक्षीने झाली आहेत माझी स्वप्ने साकार !
पुढेही मला साथ हवी आहे त्याची...
रिमझिमणाऱ्या पावसाची ...अहं माझ्या मित्राची !